<p>कोरोना विषाणूचा नवा अवतार अर्थात ओमिक्रॉनमुळं सगळेच देश चिंतेत आहेत. अशातच वैद्यकीय तज्ज्ञांपासून सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न म्हणजे ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी प्रभावी आहेत का? की कोरोनाच्या या नव्या अवतारापुढे लशी निष्प्रभ ठरताहेत? आणि याच संदर्भात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांनी व्यक्त केलेलं मत आपल्या सर्वांची चिंता वाढवणारं आहे...ओमिक्रॉन व्हेरियंटच्या स्पाईक प्रोटीन क्षेत्रात ३० पेक्षा अधिक परिवर्तन आढळून आलेत. त्यामुळं या व्हेरियंटवर लशीचा प्रभाव होण्याची शक्यता कमी असल्याचं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय. अद्याप ओमिक्रॉनवर कोणत्याही लशीच्या प्रभावासंदर्भात अधिकृत अहवाल किंवा ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/india-will-covid-vaccines-work-on-omicron-1015180
0 Comments