Omicron variant : ओमिक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार का? राजेश टोपेंचं महत्वाचं वक्तव्य

Coronavirus new variant :  कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आढळल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्यात कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर अनेक ठिकाणचे निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्याशिवाय एक डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित होत असताना दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आरोग्य सचिव या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे.

राजेश टोपे यांनी म्हटले की, शाळेबाबत आरोग्य विभागाने परवानगी दिली असली तरी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. शाळा सुरू होण्याची आमची परवानगी आहे. पियाड्रिक स्टाफने अगोदरच या बाबत अनुकलता दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.

मॉल्स ,थेटर सगळीकडे अटींसह परवानगी दिलेली आहे. पुढील काळात संक्रमण लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करायचे का या बाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले. लसीकरणाची सक्ती केली जाऊ शकत नाही. मात्र, लसीकरण करावे यासाठी प्रभावी पद्धतीने लोकांना समजवून सांगण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत या विषयांवर असणार भर

या बैठकीत दक्षिण आफ्रिका तसेच इतर युरोपियन राष्ट्रातून येणाऱ्या विमान प्रवाशांमुळे होणारा प्रादुर्भाव त्यावरील उपायांची चर्चा करण्यात येणार आहे. त्याशिवाय कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला सामोरे जाण्यासाठीच्या सज्जतेबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारतात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटनं जगभरात खळबळ माजवली आहे. ओमिक्रोन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं बोललं जातेय. या नव्या व्हेरिएंटनेही भारतात एन्ट्री केली आहे. शनिवारी संध्याकाळी भारतात ओमिक्रोन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकावरुन भारतात परतलेल्या दोन प्रवासी ओमिक्रोन व्हेरिएंटपासून बाधित असल्याचं शनिवारी समोर आलं आहे. यानंतर कर्नाटकसह देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

ओमिक्रोनचं संकट, महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक

कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे

ओमिक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणार; मुंबई महापालिकेचा निर्णय

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/coronavirus-new-variant-omicron-threat-will-be-effect-on-reopening-of-school-1015058

Post a Comment

0 Comments