<p>आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन, राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी नवी नियमावल तयार केलीय. ज्यामधे कोरोनाची लस न घेतलेल्याला दुकानात प्रवेश दिल्यास, दुकानदाचराला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. महाराष्ट्र मर्चंट ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर संघटनेनं याला विरोध केलाय. नियमावली ठरवताना नेते वेगळी आश्वासन देतात आणि प्रत्यक्षात अधिकारी वेगळेच नियम लागू करतात असा आरोप व्यापारी संघटनांनी केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-businessmen-oppose-the-new-instructions-of-maharashtra-government-1015393
0 Comments