<p>बारा ज्योर्तिलिंगापैकी पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैद्यनाथ मंदिराला, आरडीएक्सनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. परळी वैद्यनाथ देवस्थानाचे सचिव राजेश देशमुख यांना हे धमकीचं पत्र पाठवण्यात आलंय. सध्या देवस्थानाकडे खूप पैसे जमा झाले आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सनं मंदिर उडवून देऊ अशी धमकी पत्रातून देण्यात आली आहे. धमकीचं पत्र कुणी पाठवलं याचा पोलीस शोध घेताहेत.. मंदिर परिसरातला पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय. दरम्यान याआधी २० वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी परळी वैद्यनाथचं मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-parli-vaijnath-temple-threat-letter-to-rajesh-deshmukh-secretary-of-parli-vaijnath-devasthan-1014853
0 Comments