दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. एक डिसेंबरपासून शाळा सुरु होणारच, सरकारकडून परिपत्रक जारी, नाशिकमधल्या शाळा 10 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, मुंबईतल्या शाळांबाबत संभ्रम

2. राज्यसभेतील 12 निलंबित खासदारांवरुन राजकारण तापणार, रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची सकाळी 10 वाजता बैठक, माफी मागून संसदेत परतणार का खासदार, याकडे लक्ष

3. तृणमूल अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबई दौऱ्यावर, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

4. ट्विटरचा कारभार आता मुंबईकराच्या हातात, आयआयटी मुंबईतून शिक्षण घेतलेले पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओ पदावर नियुक्ती, जॅक डॉर्सी पायउतार

5. परशुराम घाटात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना, हायकोर्टात महाधिवक्त्यांची ग्वाही, माझाच्या बातमीची कोर्टाकडून दखल तर मुंबई गोवा महामार्गाची जबाबदारी केंद्राचीच असल्याची सरकारची कोर्टात माहिती

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 30 नोव्हेंबर 2021 : मंगळवार : ABP Majha

6. महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं पावसाचा अंदाज

7. रस्ते रुंदिकरणासाठी BMC नं काय पावलं उचलली? बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवरुन लोकायुक्तांचा सवाल

8. दक्षिण आफ्रिकेत प्रसार झालेला ओमिक्रॉन व्हेरियंट सर्वात घातक, डब्ल्यूएचओचा इशारा, परदेशातून येणाऱ्यांसाठीही कडक नियमावली

9. सोने-चांदी पुन्हा एकदा महागले, सोने प्रतितोळा 242 रुपये, चांदी किलोमागे 543 रुपयांनी महाग, ऐन लगीनसराईत ग्राहकांना महागाईचा झटका

10. स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सीनं सातव्यांदा पटकावला प्रतिष्ठेचा 'बॅलन डि'ओ अवॉर्ड, पोर्तुगालच्या रोनाल्डोलाही टाकलं मागे

अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सीनं पुन्हा एकदा 'बॅलन डी'ओर अवॉर्ड जिंकला आहे. मेस्सीनं अवॉर्ड रेकॉर्ड सातव्यांदा आपल्या नावे केला आहे. 34 वर्षांच्या मेस्सीनं पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तायानो रोनाल्डो आणि बायर्न म्यूनिखचा स्टार रॉबर्ट लेवानडॉस्कीला मागे टाकत हा अवॉर्ड आपल्या नावे केला आहे. यापूर्वी मेस्सीनं 2009, 2010, 2011, 2012, 2015 आणि 2019 मध्ये 'बॅलन डी'ओर अवॉर्ड जिंकला होता.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-30-november-2021-tuesday-maharashtra-1015364
0 Comments