<p>Solapur Accident News : सोलापूर-पुणे महामार्गावर भिमानगर येथे ट्रक आणि मळी वाहक टँकरचा भीषण अपघात झालाय. या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला . तर सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सोलापूरच्या दिशेने निघालेला मळीचा टँकरच्या चालकांचा ताबा सुटला. त्यामुळे टँकर दुभाजकावरुन समोर उभारलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यामध्ये चालकांचा आणि ट्रकमध्ये बसलेल्या इतर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर सहा व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमीवर <a title="पुणे" href="https://ift.tt/3nPJ5T0" data-type="interlinkingkeywords">पुणे</a> जिल्ह्यातील इंदापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/solapur-pune-highway-road-accident-near-bhimanagar-five-dead-and-six-inured-1015028
0 Comments