काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले...

Ajit Pawar : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अधिवेशन काळात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडे सोपवायवला हवी होती, असेही विरोधकांनी म्हटले होते. विरोधकांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये असे अजित पवार यांनी म्हटले.

विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, या अधिवेशानात तीन विधेयके मागे घेण्यात आली आहेत. अधिवेशनाचे कामकाज व्यवस्थित पार पाडले असून शक्ती विधेयकालाही या अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे. इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी 435 कोटी मंजूर करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.

विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ठरलेल्या निधीपेक्षा अधिक निधी सरकारने दिला आहे. विदर्भाला 3 टक्के अधिक रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री अधिवेशनाला का आले नाहीत? अजित पवार म्हणाले...

राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीशिवाय हे अधिवेशन पार पाडले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधीमंडळात येऊन दोन्ही सभागृहाची पाहणी केली होती. विधिमंडळात झालेल्या प्रत्येक विषयात सहभागी होऊन मार्गदर्शन करत होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री सभागृहात येणार होते. परंतु कोरोना संख्या वाढत आहे त्यामुळेच त्यांच्या  आम्ही अधिवेशनास न येण्याची विनंती केली होती, असे पवार यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ: मुख्यमंत्रीपदाचा चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू : अजित पवार

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-deputy-cm-ajit-pawar-criticized-bjp-on-caretaker-chief-minister-demand-1021624

Post a Comment

0 Comments