नारायण राणे महाविकास आघाडीला धक्का देणार? सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीची आज मतमोजणी

Sindhudurg District Bank Election : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी होणार. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत.

गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी तब्बल 968 मतदारांनी म्हणजे 98.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 115 महिला व 853 पुरुषांचा समावेश होता.  कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. शांततेत मतदान प्रकिया पार पडली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण 14 विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात उभे आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मतदारांचा कौल कुणाला? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

आज, शुक्रवारी ओरोस येथे सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी ओरोस येथे शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी होणार आहे.

एकूण तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, पहिल्या फेरीमध्ये विकास सोसायटीच्या 8 प्रतिनिधींची मतमोजणी दुसऱ्या फेरीमध्ये संलग्न सहकारी मतदार संघ आणि दोन महिला व तिसऱ्या फेरीमध्ये राखीव मतदारसंघाची मतमोजणी अशी एकूण तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, आता नितेश राणेंसमोरील पर्याय काय ? वकिलांनी दिली माहिती

<a href="https://ift.tt/3sPRHvX Rane : नितेश राणेंचा जामीन फेटाळला, शिवसैनिकांनी फटाके फोडले, 'राणेसाहेब मुलाला हजर करा', वैभव नाईकांचा टोला

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sindhudurg-district-bank-election-vote-counting-tussle-between-narayan-rane-and-shiv-sena-led-panel-1022102

Post a Comment

0 Comments