<p>10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस, अर्थात कोरोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या डोसचं वितरण सुरु होणार आहे. मात्र तुम्ही ज्या लशीचे दोन डोस घेतले आहेत, तीच लस बुस्टर डोस म्हणून दिली जाण्याची शक्यता कमी आहे.. कारण बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी केली जातेय. कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचं एका अभ्यासानंतर समोर आलंय. या संदर्भातील अहवाल अजून प्रसिद्ध व्हायचा आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-covid-19-vaccine-booster-dose-1021132
0 Comments