Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

अधिवेशनाचे दोन दिवस उरले; आज विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन वातावरण तापण्याची शक्यता

Maharashtra Vidhimandal Assembly Session : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे (Maharashtra Vidhimandal Session) शेवटचे दोन दिवस उरले आहे. आज आणि उद्या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारला राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार याचाही सस्पेन्स कायम आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपाल सरकारला अडचणीत आणण्यासाठी काही वेगळा निर्णय घेणार का याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे. तर, भाजप विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार का? असा देखील प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आहे.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं काल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून आज (सोमवारी) निर्णय कळवणार असल्याचं सांगितल्याचा दावा या नेत्यांनी केला होता. राज्यपाल सकारात्मक असल्याचंही नेत्यांनी स्पष्ट केलं होतं.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिलाय. त्यांनी लवकर मंजूरी द्यावी, यासाठी त्यांची भेट घेतलीय. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्याच जाहीर करावा, अशीही त्यांना विनंती करण्यात आली आहे. ते हा कार्यक्रम मंजूर करतील अशी आम्हाला खात्री आहे, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं होतं.

संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Sindhudurg News : कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Narayan Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नितेश राणेंचे वडिल आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीच ही शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणात नितेश राणेंना नाहक गोवलं जातंय, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी नितेश राणेंविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधाराला अटक करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे.

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पेटला आहे. कणकवलीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नारायण राणे यांनीच ही शक्यता वर्तवली, तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणी नितेश राणेंना अटक करण्याची मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात थेट सामना होत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात सत्ताधारी आघाडी नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. तर राणेंच्या आरोपांनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी या हल्ला प्रकरणातल्या सूत्रधारावर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात मोर्चा काढायचं ठरवल्यानं शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

from maharashtra https://ift.tt/3puq9db
via IFTTT
0 Comments