Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

१. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण,१० जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठांना बुस्टर डोस, पंतप्रधान मोदींचं जनतेला न्यू इयर गिफ्ट

PM Narendra Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील नागरिकांच्या लसीकरणासह (Vaccination) बूस्टर डोस संबधी देखील माहिती दिली. तसंच सध्या सुरु असलेल्या सणांच्या काळातही काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

नेमक्या तीन घोषणा काय?

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 Age Vaccination) मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.

अजूनही काळजी घेणं महत्त्वाचं

कोरोनाच्या संकटाबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारत या संकटाचा सामना मोठ्या शिताफीने करत असल्याचं सांगतिलं. आतापर्यंत 141 कोटी जनतेचं लसीकरण झालं असून आपली अर्थव्यवस्थाही उस्ताहजनक आहे. दरम्यान लसीकरण कोरोनाविरुद्ध एक मोठं शस्त्र असल्याचंही ते म्हणाले. तसंच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, कोरोना अजूनही गेला नसल्याने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

२. लहान मुलांसाठी पहिल्या स्वदेशी लशीला हिरवा कंदील, १२ ते १८ वयोगटातील मुलांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस मिळणार

३. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस हायकमांड कुणाला कौल देणार याची उत्सुकता शिगेला, संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण आणि के. सी. पाडवींच्या नावाची चर्चा

४. सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंतच शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन मिळणार, काकड आणि शेजारतीसाठी भक्तांना प्रवेश नाही, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानं निर्बंध

५. राज्यातील थंडी कमी होणार... खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, तर २८ आणि २९ डिसेंबरला मराठवाड्यातील काही भागात पावसाचाही अंदाज

६. आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात, वाद विसरुन आफ्रिकन सफारी फत्ते करण्याचा विराटसेनेचा निर्धार, टीम सिलेक्शनचा गुंता सोडवण्याचं आव्हान

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-26-december-2021-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1020927
0 Comments