देवाच्या विष्णुपदी येण्याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. आषाढी यात्रा त्यानंतर सुरु झालेला चातुर्मास आणि नंतर आलेली कार्तिकी यात्रा यामुळे शिणलेल्या विठुराया मार्गशीर्ष महिना सुरु होताच विश्रांतीसाठी विष्णुपदी असतात. त्यामुळे रोज हजारो भाविक येथे देवाच्या दर्शनासाठी होड्यातून आणि रस्त्याच्या मार्गाने विष्णुपदावर येत असतात. मार्गशीर्ष अमावस्या अर्थात वेळ अमावास्येला रात्री विष्णुपदावर देवाच्या पादुकांचे पूजन होऊन त्यांना वाजत गाजत पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात येत असतात. सध्या कोरोनाचे संकट असल्याने शासकीय निर्बंधामुळे आज वेळ अमावास्येला सायंकाळी मंदिर समितीच्या सजवलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून विठुराया पुन्हा विठ्ठल मंदिरात परतले.
पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी नवीन नियमावली
ओमायक्रॉन संसर्गाचे सावट आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्यात जमाव बंदी व इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर प्रशासनानेही दर्शनाच्या वेळेवर बंधने आणली आहेत. (Coronavirus Maharashtra pandharpur temple restriction for vitthal darshan in temple) रात्री 9 वाजता विठूरायाचे मंदीर भाविकांसाठी बंद होणार आहेत. मंदीर प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने घेतलेल्या जमाव बंदीच्या निर्णयाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंढरपूरमध्ये नाताळाच्या सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदीर प्रशासनाने जमाव बंदीच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता भाविकांसाठी रात्री 9 वाजता मंदीर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना विठूरायाच्या दर्शनासाठी रात्री 9 वाजण्याच्या आधीच मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात रात्री 9 नंतर जमावबंदी आदेश दिल्याने आजपासून विठ्ठल मंदिर रात्री नऊ वाजता भाविकांसाठी बंद राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/3GXsiVs Majha Impact: सोन्या-चांदीचे दागिने वितळवून नवे अलंकार करण्याचा निर्णय; पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय
<a href="https://ift.tt/3ELfiQo Year 2022 : नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं; निर्बंध असतानाही राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pandharpur-vitthal-mandir-update-vithuraya-comes-at-temple-from-vishnupad-1022740
0 Comments