<p>'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. पुण्यातील आळंदीत महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला काल कोल्हेंनी अभिवादन केलं..यावेळी आत्मक्लेश करतानाच नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्यात त्यांच्याप्रती दिलगिरीही कोल्हे यांनी व्यक्त केलीय. दरम्यान व्हाय आय किल्ड गांधी चित्रपट आज ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे..</p> <p> </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/pune-amol-kolhe-visit-mahatma-gandhi-raksha-kalash-samadhi-1029292
0 Comments