Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

१. मुंबईत मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना पालिकेकडून २१ दिवसांची मुदत, थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त होणार, मार्च अखेरपर्यंत सुमारे दीड हजार कोटी वसुलीचे उद्दिष्ट

२. सुपरमार्केटमध्ये वाईनविक्रीचा निर्णय आणि नाईट लाईफच्या संकल्पनेवरुन संभाजी भिडेंची आगपाखड, तर लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या निर्णयावरुन चक्क न्यायमूर्तींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

३. एन. डी. पाटलांच्या निधनानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, हमीद आणि मुक्ता दाभोलकरांनी ७ कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा अविनाश पाटलांचा आरोप

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधे पडलेली फुट अधिकच मोठी होताना दिसतेय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबीयांच्या समितीत सक्रिय होण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्या सोबत काम करतोय तर दुसरा गट अविनाश पाटील यांच्या सोबत काम करतोय. नुकतेच एन डी पाटील यांचे निधन झाल्यावर या दोन गटातील वाद पुन्हा उफाळून आलाय. एन डी पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या जागेवर एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटाने घेतला. मात्र अविनाश पाटील यांनी याला आक्षेप घेतलाय. येत्या जून महिन्यात संस्थेच्या कार्यकारिणीत याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं अविनाश पाटील यांनी पत्रक काढून म्हटलंय. त्याचबरोबर हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या ट्रस्टवर अवैधरित्या ताबा मिळवल्याचा आरोप अविनाश पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर नरेंद्र दाभोलकरांच्या कुटुंबीयांवर घराणेशाहीचा आरोपही त्यांनी केलाय. यावर अद्याप हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्याकडून मात्र काही प्रतिक्रिया आलेली नाही. दोन्ही

४. तूर्तास मास्कमुक्त महाराष्ट्राचा गैरसमज डोक्यातून काढून टाका, कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कच मोठं हत्यार असल्याचं आदित्य ठाकरेंचं मत

५. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घ्या, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची सूचना, परीक्षेआधी लसीकरण पूर्ण करण्याचीही विनंती

६. मध्य प्रदेशातील भिंडमध्ये सिंध नदीत नौका बुडाली, १२ पैकी १० जणांना वाचवण्यात यश, दोन लहान मुलांचा शोध सुरु

मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यातून वाहणाऱ्या सिंध नदीत एक नौका बुडाली.. दुर्घटनेवेळी बोटीत १२ जण होते. त्यापैकी १० जणांना वाचवण्यात आलंय. मात्र दोन लहान मुलं अजूनही बेपत्ता आहेत..या दुर्घटनेची काही दृश्य इतर बोटीतल्या उपस्थितांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे..

७. बेस्टच्या ताब्यात लवकरच नव्या रुपातल्या ९०० डबलडेकर इलेक्ट्रिक एसी बसेस येणार, मुंबईकरांचा प्रवास गारेगार आणि आणखी सुकर होणार

from maharashtra https://bit.ly/35ytKzA
via IFTTT
0 Comments