Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

1. ओमायक्रॉनमुळं बंद झालेल्या शाळा आजपासून सुरु होणार, पालकांच्या भूमिकेकडे लक्ष, तर १४ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू न करण्याचा स्थानिक प्रशासनाचा निर्णय,
राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात तब्बल सातशे दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. उद्यापासून शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावलं कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

2. मी देखील गुन्हेगार...निवडणुकीत कमी पडल्याची कबुली देताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य; भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसप्रमाणे रिंगणात उतरण्याचा शिवसेना नेत्यांना सल्ला

3. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याचं आव्हान, दुपारी साडे तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

4. नाना पटोलेंकडून मोदींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच, भाजप आक्रमक, नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पुतळ्याचं दहन

5. पाकिस्तानातून मुंबईत धडकलेलं धुळीचं वादळ कोकणात धडकणार, ताशी 20 ते 30 किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज

Dust storm north Konkan area include Mumbai : पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. काल सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे. सुमारे तास 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागांत धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.

6. राज्यातील कमाल तापमानात मोठी घट, मुंबईसह राज्यभरात गारवा वाढला, पुढील 2-3 दिवस चित्र कायम राहणार

7. मोठ्या शहरांत झपाट्यानं पसरणारा ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर, ‘इन्साकॉग’चा इशारा, बीए.टू व्हेरियन्टचाही भारतात शिरकाव

8. एबीपी माझाचा सर्वात मोठा इम्पॅक्ट, रणजीतसिंह डिसले गुरुजींना अखेर रजा मंजूर, अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा

9. वीज कापण्याशिवाय आता पर्याय नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाणीपुरवठा विभागासह विविध विभागांकडे 8 हजार 924 कोटींची थकबाकी.

10. चित्तथरारक सामन्यात भारत चार धावांनी पराभूत, एकदिवसीय मालिका 3-0 ने गमावली, आफ्रिकेकडून क्लिनस्वीप

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-january-24-2022-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1027811
0 Comments