Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/3nXO0km Day Parade : प्रजासत्ताक दिनी राजपथावर दिसणार देशाचे सामर्थ्य, राजपथावरील परेडची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर

<a href="https://ift.tt/3H4Ullt Republic Day Parade : <a href="https://ift.tt/3r0sCwP व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज दिल्लीतील राजपथावर देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवाय लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख पंतप्रधान पंतप्रधानांसोबत उपस्थित राहणार आहेत. राजपथावरील संचलनाबाबत वाचा सविस्तर.

ध्वजारोहणानंतर हवाई दलाचे चार हेलिकॉप्टर राजपथवरील आकाशात झेपावतील. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केल्यानंतर परेड कमांडर लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा राजपथवर पोहोचतील. परेडचे सेकंड इन कमांड मेजर जनरल आलोक कक्कर यांच्या आगमनानंतर परेडची विधिवत सुरुवात होईल. या वर्षीपासून परेड सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. दरवर्षी 10 वाजता सुरू व्हायची. मात्र, हवामानामुळे परेड अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. सर्वप्रथम, देशातील परमवीर चक्र विजेते आणि अशोक चक्र विजेते खुल्या जिप्सीमध्ये राजपथवर पोहोचतील आणि राष्ट्रपतींना अभिवादन करतील. यानंतर लष्कराचे 61 घोडदळाचे तुकडी दाखल होईल.

भारतीय लष्कराचा यांत्रिकी ताफा
यंदाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्कराचे सामर्थ्य दिसणार आहेच शिवाय 1971च्या युद्धात पाकिस्तानची दैना करणारे विंटेज रणगाडे आणि तोफांचे दर्शन घडणार आहे. 1971 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा उडवणारे PT-76 आणि सेंच्युरियन रणगाडे राजपथावरील परेडमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतील. हा विंटेज टँक आता लष्कराच्या युद्ध ताफ्याचा भाग नाही आणि त्याला खास संग्रहालयातून परेडसाठी बोलावण्यात आले आहे. नुकतेच देशात 1971 च्या युद्धाचे सुवर्ण विजय वर्ष साजरे झाले. याशिवाय 75/24 विंटेज तोफ आणि टोपाक आर्मर्ड पर्सनल कॅरियर व्हेईकल देखील परेडचा भाग असेल. 75/24 तोफ ही भारताची पहिली स्वदेशी तोफ होती आणि तिने 1965 आणि 1971 च्या युद्धात भाग घेतला होता. यासह आकाशात हेलिकॉप्टरचे डायमंड फॉर्मेशन दिसेल.

विंटेज मिलिटरी हार्डवेअर व्यतिरिक्त, आधुनिक अर्जुन टँक, BMP-2, धनुष तोफ, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, सावत्रा ब्रिज, टायगर कॅट मिसाइल आणि तरंग इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीसह एकूण 16 यांत्रिक स्तंभ परेडमध्ये सामील आहेत.

प्रजासत्ताक दिनाआधी भारताला श्रीलंकेकडून मोठी भेट, 56 भारतीय मच्छीमारांची सुटका

<a href="https://ift.tt/3u5WCJP Lanka to Release Indian Fishermen : प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी भारताला श्रीलंकेने मोठी भेट दिली आहे. श्रीलंकेच्या न्यायालयाने मंगळवारी <a href="https://ift.tt/3H6X65W भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचे आदेश दिले. या मच्छिमारांना श्रीलंकेच्या समुद्रात मासेमारी केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते. तामिळनाडूच्या नेत्यांनीही या मच्छिमारांच्या सुटकेची मागणी भारत सरकारकडे अनेकदा केली होती. श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता एकही भारतीय मच्छिमार त्यांच्या ताब्यात नसल्याचंही श्रीलंकेनं सांगितलं आहे.

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद
कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, न्यायालयाने 56 भारतीय मच्छिमारांच्या सुटकेचे आदेश दिल्याचे जाणून आनंद झाला. दुसरीकडे, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट केले की, ''मी उच्चायुक्त गोपाल बागले आणि त्यांच्या टीमच्या सुटकेची खात्री करण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक करतो.''

आता एकही मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात नाही
श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी तसेच भारतीय राजनैतिक सूत्रांनी सुटकेची पुष्टी केली आणि सांगितले की मंगळवारच्या आदेशानंतर श्रीलंकेत एकही भारतीय मच्छिमार कोठडीत नाही. मच्छिमारांना सोडण्याचा न्यायालयाचा आदेश अशा वेळी आला जेव्हा भारतीय अधिकाऱ्यांनी श्रीलंकेला आर्थिक मदत चर्चेच्या पार्श्वभूमीवर मानवतावादी आधारावर त्यांची सुटका करण्याचे आवाहन केले.

भारताकडून श्रीलंकेला मोठे आर्थिक पॅकेज

भारताने या महिन्यात श्रीलंकेला त्याच्या वाईट परकीय चलनाच्या संकटाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले. 13 जानेवारी रोजी, भारतीय उच्चायुक्तालयाने श्रीलंकेला 900 दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली. काही दिवसांनंतर, 19 जानेवारी रोजी, भारताने पुन्हा 500 दशलक्ष डॉलरची मदत दिली. या मदतीने श्रीलंका आपल्या देशाच्या गरजेनुसार पेट्रोलियम उत्पादने खरेदी करू शकेल.

from maharashtra https://ift.tt/3fZNI89
via IFTTT
0 Comments