Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

1. महाराष्ट्र मास्कमुक्त करता येईल का याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत खलबतं, मास्कमुक्त झालेल्या देशातल्या परिस्थितीचा अभ्यास करणार, टास्क फोर्ससोबत चर्चेनंतरच निर्णय घेणार

2. सरकारी नोकरीतल्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार, सेवाज्येष्ठतेनुसार आरक्षण देण्याच्या शासनआदेशाला याचिकाकर्त्यांचा विरोध

3. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, 29, 30 जानेवारी आणि 5, 12 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, तर म्हाडाच्या परीक्षांच्या वेळापत्रकातही पुन्हा बदल

4. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षाचा होण्याची शक्यता, डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

5. लवकरच सुपरमार्केटमध्ये वाईनची बाटली मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

6. मित्राच्या मृत्यूनंतर आठ ते दहा जणांकडून रुग्णालयात तोडफोड,नागपूरमधील धक्कादायक घटना, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप.

7. राज्यात गुरुवारी 25 हजार 425 कोरोनाबाधितांची नोंद तर 42 जणांचा मृत्यू, ओमायक्रॉनच्या 72 रुग्णांची नोंद

8. पोलीस विभागामार्फत नागरिकांना एका OTP द्वारे घरबसल्या मिळणार लोकसेवांची माहिती, राज्यात प्रथमच पोलीस विभागाकडून सुविधा

9. राहुल गांधींसमोर मुख्यमंत्री चन्नी यांची सिद्धूंना 'जादू की झप्पी'; राहुल गांधींना म्हणाले, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या पंजाब दौऱ्यावेळी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांना मिठी मारली. आमच्यामध्ये कोणताही वाद नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, त्यांच्या निर्णयामागे आम्ही सर्वजण उभे राहू असंही ते म्हणाले. त्यामुळे किमान राहुल गांधींच्या समोर तरी या दोन्ही नेत्यांची दिलजमाई झाल्याचं चित्र दिसून आलं. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, "मला कोणत्याही पदाची आशा नाही. राहुल गांधींनी योग्य व्यक्तीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावा. त्याच्यामागे आम्ही सर्वजण एकदिलाने उभे राहू. पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे. आपल्यात आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्याच कोणताही वाद नाही."

10. एलआयसीचा आयपीओ मार्चपर्यंत येणार, दीपमच्या सचिवांची माहिती, आयपीओतून एक लाख कोटीपर्यंतचा फंड सरकार उभारणार

from maharashtra https://ift.tt/3s0sFYT
via IFTTT
0 Comments