Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/3tV9kLb : चिंता वाढली! देशभरात Omicronचा कम्युनिटी स्प्रेड; वाढती रुग्णसंख्या, WHO म्हणतं...

Coronavirus Update : कोरोना व्हायरस (Coronavirus) नं गेल्या दोन वर्षांत सर्वांची धाकधुक वाढवली आहे. आतापर्यंत या व्हायरसबाबत अनेकांच्या मनात अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. काही लोकांचा तर असाही समज आहे की, कोरोना पर्व आता संपलं आहे. पण हा समज चुकीचा आहे. कारण देशात दररोज 3 लाखांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची झपाट्यानं वाढ होत आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं WHO नं नवा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओ म्हणतं की, कोरोनाचा ओमायक्रॉन हा शेवटचा व्हेरियंट नाही, BA.2 सारखे स्ट्रेन भविष्यात अनेक दिसून येतील. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंट आता देशात कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यावर पोहोचला आहे. याचा अर्थ असा आहे की, कोणतीही व्यक्ती, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येता किंवा संक्रमित ठिकाणी भेट न देता, कोरोना पॉझिटिव्ह होईल.

6 फेब्रुवारीपासून कोरोनाचा जोर वाढणार

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासच्या एका अभ्यासानुसार, 6 फेब्रुवारीपर्यंत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढणार आहे. म्हणजेच, पुढील 2 आठवड्यांपर्यंत 6 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असतील. अभ्यासात म्हटलं आहे की, 'आर-व्हॅल्यू', जे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार दर सांगते, ते 14 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान आणखी कमी होऊन 1.57 वर आलं आहे. जर हा दर एकापेक्षा कमी झाला तर असं मानलं जातं की, जागतिक महामारी संपली आहे.

सांगली: जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात राडा, निविदेच्या वादातून हाणामारी

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या सांगलीतील निवासस्थानी राडा झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका निविदेच्या वादातून हाणामारी झाली असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या पतीने ही तक्रार दाखल केली आहे.

आरोच्या निविदेवरून दोन गटात वाद झाल्याची चर्चा आहे. निविदेवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून हाणामारी आणि तोडफोड करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांचे पती नंदू कोरे, कुटुंबातील अन्य आणि जिल्हा परिषद सभापती आणि काही सदस्यांमध्ये वाद झाला. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवासस्थानात दारू पिऊन येऊन सभापती आणि काही सदस्यांनी मला आणि माझ्या भावास मारहाण केल्याचा आरोप नंदू कोरे यांनी केला. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवासस्थानाततील खुर्च्या, कुंड्याची देखील तोडफोड करण्यात आली.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-january-25-2022-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1028102
0 Comments