Maharashtra Weather Update : राज्यात पुढील 24 तास हुडहुडी; मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातही गारठा वाढला

Maharashtra Weather Update : पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवलं गेलं आहे. पुढील दोन दिवस राज्यातील थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानत घट राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2 दिवस राज्यात शीत लहर कायम राहणार आहे. कमाल आणि किमान तापमानात घट  होऊ शकते. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस  जाणार आहे.  दिवसभर वातावरणात गारवा राहू शकतो. पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात थंडीची लाट आली आहे.  कमाल तापमानात घट दिसणार मात्र किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही.

राज्यभरात गारठा वाढला आहे. सलग तिसऱ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट कायम आहे. नंदुरबारच्या दुर्गम भागात तापमान 5 अंश सेल्सियसवर गेलं आहे. तर, तोरणमाळ परिसरात दव बिंदू गोठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात चढउतार सुरु आहे. गोंदियात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसवर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. अशातच गोंदीयात थंडीची लाट येणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं अवघं वातावरण ढवळून काढलं आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीडमधील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहणार, दिवसाच्या तापमानातही घट दिसेल. तसेच कोकण पट्ट्यातही थंडी वाढली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नेमकं काय म्हणाले दिग्दर्शक सुनील दर्शन

एखादी महिला केस घेऊन आली तर तिचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या, त्यांची सुरक्षा ही आपली जबाबदारी; दिलीप वळसे पाटलांचे पोलिसांना आवाहन

<a href="https://ift.tt/3AwSjIF Impact : त्र्यंबकेश्वरमधील आदिवासी भागात प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्याची पहाट, खरशेतमध्ये नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-update-cold-spell-to-remain-till-friday-in-all-over-maharashtra-says-imd-1028574

Post a Comment

0 Comments