कराड तालुक्यातल्या करपे गावात एका 5 वर्षाच्या मुलावर बिबट्यानं हल्ला केला आहे. शेतकरी धनंजय देवकर आपल्या पाच वर्षाच्या मुलासह शेतातून परतत असताना बिबट्यानं हा हल्ला केला. लहान मुलावर झडप घालून बिबट्यानं त्याला झाडीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला..त्याच वेळी वडिलांनीही आपल्या मुलाचे पाय पकडून ठेवले. एकीकडे बिबट्या लहान मुलाला ओढत होता..तर दुसरीकडे त्याचे वडील जीवाच्या आकांतानं आपल्या मुलाला ओढत होते.. आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला.. जखमी मुलगा सध्या कराडमधल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-tiger-attack-5-year-old-boy-in-karad-taluka-1027181
0 Comments