<p><strong>Deccan Queen : </strong> मुंबई आणि पुणेकरांची अत्यंत जवळची डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आता नव्या रुपात दाखल झाली आहे. या गाडीचे नवे रुप आपण एबीपी माझावर पाहणार आहोत. चेन्नईत इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये या गाडीचे नवीन डबे बनविण्यात आले असून हे एल एच बी तंत्रज्ञानावर आधारित डबे असल्याने ते हलके मात्र जास्त सुरक्षित आहेत. तसेच या गाडीची रंगसंगती देखील पूर्णतः बदलण्यात आलेली आहे. आणि गाडीच्या इंटेरियरमध्ये देखील मोठे बदल करण्यात आलेले आहे. या गाडीचे वैशिष्ट्य असलेला डायनिंग कार देखील बनवण्यात आला असून त्याची आसन क्षमता 32 वरून 40 इतकी वाढवण्यात आलेली आहे. नव्या रूपातल्या या डेक्कनक्वीनमध्ये अशा अनेक नवीन सुविधा देखील देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा आणि पुणेकरांचा प्रवास अधिक सुरक्षित तसेच आरामदायी होईल. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-deccan-queen-in-new-look-1036551
0 Comments