<p>खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय सुनावणार आहे. याबाबत आनंदराव अडसूळ यांनी तक्रार दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं नवनीत राणांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. त्यानंतर नवनीत राणा यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. ज्यावर आज निर्णय येणार आहे. त्यामुळे नवनीत राणांना दिलासा मिळणार की न्यायालय त्यांना फटकारणार हे पाहावं लागणार आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/india-supreme-court-to-give-final-verdict-on-mp-navneet-rana-caste-caste-validation-certificate-1035562
0 Comments