<p>बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी आज श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.. यावेळी अमिताभ यांच्यासोबत अभिषेक बच्चनही होते.. सिद्धिविनायक मंदिर देवस्थानाचे विश्वस्त आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राजाराम देशमुख यांनी अमिताभ बच्चन यांना बाप्पाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या झुंड या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्यात. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे..</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-at-the-feet-of-amitabh-bachchan-siddhivinayak-1037897