Covid-19 Restrictions : आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही

Maharashtra to lift all Covid-19 Restrictions : आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधपासन मुक्तता मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने मोठी घट पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये तर एकही कोरोना रुग्ण आढळत नाही. त्यातच सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील.

महत्त्वाची बाब म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा आणि मिरवणुका काढण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. मास्क आणि निर्बंधांची सक्ती नसली तरी, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले. कोरोना निर्बंध हटवले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आजपासून काय काय बदलणार?
- 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात करोनाचे सर्व निर्बंध हटतील
- मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येतील
- गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार
- केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल
- मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल
- हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही
- लग्न किंवा कौटुंबीक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.
- बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही.
- सार्वजनिक ठिकाणं, मॉल, बगिचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही.
- महारष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त असतील, यात्रा-जत्रा धुमधडाक्यात होणार
- निर्बंधामुळे उद्योग आणि व्यवसायांवर आलेली बंधनं हटली आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/LkwlpqW. Babasaheb Ambedkar : चैत्यभूमीवर लगबग, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात होणार साजरी, गृहविभाग लवकरच काढणार मार्गदर्शक सूचना

<a href="https://ift.tt/GyWdaxE Temple : यद्रादीतील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर भाविकांसाठी खुलं, पुर्नबांधणीमुळे बंद होतं मंदिर, मंदिरासाठी 1800 कोटी रुपयांचा खर्च

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/all-corona-restrictions-removed-in-maharashtra-no-restriction-for-mask-1046357

Post a Comment

0 Comments