Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्याचे लाईव्ह अपडेट्स...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/5TgJS3k Diesel Price : महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी महागलं, नऊ दिवसात आठव्यांदा वाढले इंधनाचे दर

<a href="https://ift.tt/MrSyfpX Diesel Price Today : देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात <a href="https://ift.tt/cu7Mr3d पैशांनी वाढ होणार आहे. 22 मार्चपासून देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल 101.01 रुपये प्रति लीटर तर डिझेल 92.27 रुपये प्रतिलीटर मिळणार आहे. मागील 9 दिवसातील ही आठवी इंधन दरवाढ आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशालाचा चाप बसत आहे. महगाई गगनाला भिडली असताना दुसरीकडे इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.

इंधन दरवाढीवर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण –
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. यावरुन विरोधीपक्षाने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. वाढत्या इंधनाच्या दरावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी राज्यसभेत इंधन दरवाढीवर मौन सोडलं. इंधनाच्या वाढत्या किंमती आपल्यासाठी एक मोठं आव्हान आहे.  अर्थ विधेयकावर चर्चा करताना सीतारमण यांनी म्हणाल्या की, 2010-11 पासून  2021-22 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील सेस साठी केंद्र सरकारने 11.37 लाख कोटी रुपये खर्च केलेत.

<a href="https://ift.tt/DiLFva1. Babasaheb Ambedkar : चैत्यभूमीवर लगबग, यंदा महामानवाची जयंती उत्साहात होणार साजरी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या वतीने मार्गदर्शक सूचना काढण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहयाद्री अतिथीगृह येथे मंगळवारी आयोजित बैठकीत सांगितले.

चैत्यभूमीवर विविध कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्यावतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात मंगळवारी सहयाद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे या बैठकीला हजेरी लावली. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढू शकते या धर्तीवर प्रशासनाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-30-march-2022-today-sunday-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1045760

Post a Comment

0 Comments