<a href="https://ift.tt/31hPzRs Budget Session : अधिवेशनाचा दुसरा आठवडा; आज ओबीसी आरक्षणासाठी विधेयक मांडणार, 'हे' मु्द्देही गाजणार

Maharashtra Budget Session 2022 : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. नवाब मलिक, ओबीसी आरक्षणासह अन्य काही मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन आज विधिमंडळात विधेयक मांडणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली होती.

दरम्यान, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. याचा प्रत्यय अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये दिसून आलाच आहे.

महाविकास आघाडीमधील दोन मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर विरोधी पक्षाच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहामध्ये गाजणारा हा सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे. यासह, आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरील कारवाई, केंद्रीय यंत्रणांचा वापर या आणि अशा अनेक मुद्द्यांवर अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

<a href="https://ift.tt/SRpfeO7 Price : देशात निवडणुकांचे वारे थांबरणार, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची धास्ती, उच्चांक गाठणार?

Petrol-Diesel Price Today 7 March 2022 : रशिया-युक्रेन युद्धामुळं (Russia-Ukraine War) जगाची चिंता वाढली आहे. अशातच दोन देशांतील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 130 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचली आहे. 2012 नंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडाला आहे. असं असलं तरी देशात मात्र गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर (Changes in Petrol Diesel Rtae) आहेत. अशातच देशात पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळेच देशातील पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) च्या किमती स्थिर असल्याचं बोललं जात आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ (Petrol-Diesel Price) होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे ( 5 State assembly election) दरात वाढ झाली नसल्याचं मानलं जात आहे. आता 7 मार्चला निवडणुकांची सांगता आणि 10 मार्चला निकाल यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती लोकांमध्ये आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने 100 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा परिणाम देशातील इंधनावर होण्याची शक्यता आहे. पण सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. अशातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर, म्हणजे 7 मार्च नंतर देशातील पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel) किंमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये 9 ते 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-07-march-2022-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1038708
0 Comments