Palghar News : जिल्हाधिकारी कार्यालयातील आर्थिक व्यवहार उघड होण्याच्या भीतीनं पत्रकारांना दालन देण्यास टाळाटाळ?

Maharashtra Palghar News : पालघर जिल्हा पत्रकार संघामार्फत बुधवारी पालघर जिल्हा प्रशासना विरोधात धरणं आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. पालघर जिल्हा मुख्यालयाच्या आवारात हे धरणं आंदोलन रात्र झाली असतानाही सुरूच होतं. जिल्हा परिषदेच्या विविध कार्यक्रमांचे निमंत्रण मिळावं, जिल्हा परिषदेच्या विशेष सभेला पत्रकारांना बसण्याची मुभा मिळावी, तसंच पालघर जिल्हा मुख्यालयाच्या निर्मितीवेळी या भव्य इमारतीत पत्रकारांसाठी एक दालन देण्यात यावं, या मागण्यासाठी हे आंदोलन सुरूच आहे.

जिल्हा परिषदेनं पत्रकारांच्या मागण्या मान्य केल्या असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधून आपल्या मागण्या मान्य करीत असल्याचं सांगितलं. दुसरीकडे  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या नियोजित स्थळीच पत्रकार कक्ष स्थापन करावा, या मागणीवर पत्रकार संघ ठाम होता. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ मात्र या मागणीवर वेगळी पळवाट काढण्याच्या निर्णयावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आर्थिक व्यवहार उघड होण्याच्या भीतीनं या ठिकाणी दालन देण्यास नकार दिला जातोय का? यावर आता सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेऊन पत्रकारांना न्याय दिला जाईल, असं उडत आश्वासन फोन वरून दिलं असेल, तरीही जोपर्यंत जिल्हाधिकारी लेखी स्वरूपात निर्णय देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा पालघर जिल्हा पत्रकार संघानं घेतला आहे.

यापूर्वी जिल्हा मुख्यालय उदघाटना वेळी पालकमंत्री दादाजी भुसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या मागण्यांविषयी पत्रकारांना जाहीर आश्वासनही दिलं होतं. मात्र जिल्हा प्रशासनाकडून हे आश्वासन पूर्ण केलं जात नसल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी हे धरणं आंदोलन केलं आहे. यावेळी संघटनेमार्फत जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पत्रकार उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच कोकण विकास पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष यांनी आंदोलनाला पाठिंबा देत प्रशासन आणि पदाधिकारी यांनी पत्रकारांच्या समस्या लक्षात घेत तातडीची चर्चा करावी अशी मागणी केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/mTrtCo1 Helicopter Service : आता हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा! भाविकांचा वेळ वाचणार

<a href="https://ift.tt/Kq5TzGP : दीड वर्षीय 'दत्ता'ला मिळणार 16 कोटींचे इंजेक्शन, लकी ड्रॉ मधून मिळाली मोफत सुविधा

<a href="https://ift.tt/H9pj2IW अंगावर कुत्रा सोडल्यानं महिला जखमी, मालकाविरोधात गुन्हा दाखल, बीड येथील घटना

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-palghar-news-fear-of-exposing-financial-transactions-in-the-collectorate-1046047

Post a Comment

0 Comments