Sangli : भर स्टेजवर शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातील 50 हजारांचं बंडल चोरणाऱ्याला बेड्या

सांगली : सांगली शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातील 50 हजार रुपयांचा बंडल चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. मिरज पोलिसांनी सांगोला इथून 21 वर्षीय चोरट्याला बेड्या ठोकल्या. स्वप्नील घुले असं या चोराचं नाव आहे. सांगलीत तीन दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात स्टेजवर जाऊन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील 50 हजार रुपयांचा बंडल चोरलं होतं.

काही दिवसांपूर्वी सांगलीच्या स्टेशन चौकात मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी मेळावा पार पडला होता. यावेळी चक्क शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातील 50 हजार रुपयांचा बंडलवर चोरट्याने मेळाव्यादरम्यान डल्ला मारला होता. स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल चोरण्याची हिंमत केली. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या. त्याचा पैसे चोरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अखेर तीन दिवसांनी या चोराला सांगली शहर आणि मिरज पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी सांगली शहर पोलिसांचे आभार मानले आणि पोलिसांचा सत्कारही विभूते यांनी केला.

Sangli : भर सभेत चोरट्यानं कापला शिवसेना नेत्याचा खिसा, 50 हजार रुपयांचा गंडा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -

ABP Majha

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/21-year-old-man-arrested-for-stealing-rs-50-000-from-shiv-sena-district-chief-s-pocket-in-sangli-1046401

Post a Comment

0 Comments