Nagpur Crime News : नागपुरात एका 51 वर्षीय मुलाने आपल्या 75 वर्षीय आईचा चाकूने वार करून खून करत स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीनिवास चोपडे असे आरोपी मुलाचे नाव असून लीला चोपडे असे हत्या झालेल्या आईचे नाव आहेत. दोघे धंतोली पोलिस स्टेशन अंतर्गत हिंदुस्थान कॉलनीमधील प्रशस्त बंगल्यात राहत होते.

आई व मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
गेले तीन ते चार दिवस दोघांकडून नातेवाईकांच्या फोनला कोणतेही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नातेवाईकांना शंका आली. एका नातेवाईकाने काल हिंदुस्तान कॉलनीमधील बंगल्यावर येऊन पाहणी केल्यावर बंगला चारही बाजूने बंद आढळला. पोलिसांच्या मदतीने घराचे दार तोडून आत प्रवेश केल्यावर लीला चोपडे यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले. त्यांच्या पोटावर चाकूने वार केल्याचे आणि मृतदेहाशेजारीच हल्ल्यासाठी वापरलेले चाकू दिसून आले. तर काही अंतरावर मुलगा श्रीनिवास विष प्राशन करून मृत आढळला.

तब्बल 20 वर्षे मुलगा नोकरी करत नव्हता
मुलगा श्रीनिवास इंजिनिअर असून त्याने लग्न केलेले नव्हते. गेले 20 वर्षे तो नोकरी सुद्धा करत नव्हता. वडिलोपार्जित मोठ्या बंगल्यात तो आईसह राहत होता. वडिलांच्या निवृत्ती वेतनावर दोघांचे जीवन सुरु होते. धंतोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास आणि त्याच्या आईचे मृतदेह चार ते पाच दिवस पूर्वीचे असून ते कुजलेल्या परिस्थितीमध्ये आढळून आले. श्रीनिवास याने असे आत्मघातकी पाऊल का उचलले या संदर्भात कोणतीही सुसाईड नोट ही लिहून ठेवलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी हत्या व आत्महत्येचे प्रकरण दाखल करून तपास सुरु केला आहे. तर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय मध्ये पाठवले आहे.

संबंधित बातम्या :

<a href="https://ift.tt/uEjPWQG Crime : एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणाचा मुलीच्या दोन नातेवाईकांवर चाकू हल्ला

<a href="https://ift.tt/43WZyjn : गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा नरबळीचा प्रयत्न, मुलीच्या सतर्कतेमुळे पोलीस मदतीला, अनर्थ टळला

<a href="https://ift.tt/UlPjwHD : आईशी झालेल्या किरकोळ वादातून चार वर्षीय चिमुरड्याची हत्या, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

source https://marathi.abplive.com/crime/maharashtra-nagpur-crime-marathi-news-unemployed-engineer-kills-75-year-old-mother-commits-suicide-or-something-else-1054233
0 Comments