Nanded Crime News : नांदेड शहरात एकाच दिवसात दोन खुनांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडालीय. तर दुसरीकडे पोलिसांसमोर बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या कार्यालयासमोर दोन गुंडांनी राडा केल्यानंतरही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने नांदेडकरांनी संताप व्यक्त केलाय. एकीकडे जुन्या नांदेड शहरात एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आलाय तर दुसरीकडे मिलगेट परिसरात संपादकावर तीक्ष्ण चाकूने वार करून हत्येमुळे शहरात खळबळ उडालीय. दरम्यान ह्या दोन्ही घटना गेल्या 24 तासात घडल्या आहेत.

नांदेडमध्ये 24 तासात दोन खुनाचे थरार

यात पहिल्या घटनेतील मयत तरुणाचे नाव अमोल साबणे असे तर दुसऱ्या घटनेतील मयत संपादकाचे नाव प्रेमानंद जोंधळे असे आहे. यात अमोल हा शुक्रवारी सकाळी शौचास पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात गेला आणि तो परतलाच नाही, रात्र झाली तरी तो घरी परत नसल्याने मित्र आणि कुटूंबियांनी शोध घेतला असता अमोलचा मृतदेह झुडपात आढळला. अज्ञात मारेकऱ्यांनी अमोलवर धारधार शस्त्राने वार करून खून केला. या प्रकरणी भाऊ श्याम साबणे याने दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या

तर दुसऱ्या घटनेत संपादक प्रेमानंद जोंधळे हे सोमेश कॉलनी येथील त्यांच्या घरून निघाले असता त्यांच्या घरा नजीक मिलगेट परिसरात त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या अल्पवयीन आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार करून निघृण हत्या केलीय. दरम्यान या दोन्ही घटनांमध्ये इतवारा पोलीस ठाणे व वाजीराबाद पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/sDPMLl3 News : मुंबई कस्टमची मोठी कारवाई; अमेरिकेतून कुरियरमधून मुंबईत ड्रग्सची तस्करी, 27 किलो ड्रग्स जप्त

<a href="https://ift.tt/3lNv6rX Crime : नागपूरच्या काटोलमध्ये 12 वर्षीय मुलाकडून 27 वर्षीय तरुणाची हत्या

Crime News : झटपट श्रीमंत होण्यासाठी इडली विक्रेता झाला तस्कर, पाच कोटींच्या अंबरग्रीससह अटक

source https://marathi.abplive.com/crime/maharashtra-marathi-nanded-crime-news-two-murder-thrills-in-24-hours-1055085
0 Comments