Todays Headline 1st May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

आज महाराष्ट्र दिन

राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा केला जोतो. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो.  1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जवळपास 106 जणांनी आपले बलिदान दिले. या हुतात्म्यांचे स्मरण 1 मे रोजी केले जाते.

राज ठाकरेंच्या सभेआधी मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला 'बुस्टर डोस'

भारतीय जनता पार्टीकडून  सोमय्या मैदानावर देवेंद्र फडणवीसांच्या बुस्टर डोस सभेचं आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.  सोहळ्यासाठी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार,  भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार  आहे.

राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक टीझर मनसेनं प्रसिद्ध केलाय.

डॉ.  सुमन बेरी नीति आयोगाच्या उपाध्यक्ष होणार

डॉ सुमन बेरी आजपासून नीति आयोगाच्या उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभळणार आहे. राजीव कुमार आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पेन्शन पोर्टलचे उद्घाटन करणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज  पेन्शन पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. लोकभवनात मुख्यमंत्री योगी पेन्शन पोर्टलची सुरुवात करणार आहे.

आयपीएलचा डबल डोस, आज दोन सामने

ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिट्लस आणि राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स रविवारी आमनेसामने आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी सात वाजता भिडणार आहेत. चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. रवींद्र जाडेजाने शनिवारी चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

आज इतिहासात

1919 : भारतीय प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म

1955 : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रांचा जन्म

1988 : अनुष्का शर्माचा वाढदिवस

1962 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना

1983 : अमरावती विद्यापीठाची स्थापना

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/todays-headline-1st-may-latest-news-top-10-headline-news-marathi-news-raj-thackeray-maharashtra-din-1055070

Post a Comment

0 Comments