Maharashtra Solapur Crime News : आर्थिक फसवणूकीच्या घटना आपण रोजच वाचत, ऐकत असतो. पण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये पोटच्या मुलानींच बापाला गंडा घातल्याचं समोर आहे. या संदर्भात वडिलांना आपल्या मुलांविरोधातच गुन्हा नोंद करावा लागला आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात (Mohol Police Station) या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील जगन्नाथ भुजंगा कोकरे यांनी मोहोळ शहरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये स्वतःचं खातं उघडलं होतं. त्या खात्यावरती त्यांची 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम शिल्लक होती. आपल्या खात्याचं त्यांनी एटीएम कार्ड काढलं होतं. परंतु, या एटीएमचा (ATM) वापर त्यांनी केला नव्हता.

मंगळवारी 31 मे रोजी ते मोहोळ येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गेले. 2 लाख रुपये काढण्यासाठी फॉर्म भरला. मात्र त्यांच्या खात्यामध्ये केवळ 647 रुपये शिल्लक असल्याची माहिती बँकेतील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यांनी या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांच्या एटीएमच्या माध्यमातून हे पैसे काढले गेल्याचं सांगण्यात आलं.

दिनांक 24 मेपासून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेळोवेळी 2 लाख रुपये काढून घेतल्याचं सांगितलं. सुरुवातीला 2 हजार रुपये त्यानंतर 25 ते 29 तारखेदरम्यान 1 लाख 80 हजार असे एकूण 2 लाख रुपये त्यांच्या खात्यावरून काढण्यात आले होते. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएमचा वापर करण्यात आलेला होता. ही माहिती एकूण शेतकरी जगन्नाथ कोकरे यांना धक्काच बसला.

या संदर्भात त्यांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची दोन्ही मुलं सागर कोकरे आणि सचिन कोकरे यांनीच हे पैसे काढल्याचं उघड झालं. या प्रकरणी सागर कोकरे आणि सचिन कोकरे या दोन्ही मुलांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/GCDv9Q6 News : Any Desk ॲपच्या मदतीने बँक खाते रिकामी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपींना अटक

<a href="https://ift.tt/vFpnjm7 चार वर्षाच्या मुलासह महिलेची विहरीत उडी घेऊन आत्महत्या

source https://marathi.abplive.com/crime/solapur-crime-news-youth-stole-the-father-money-2-lakh-cash-stolen-using-atm-maharashtra-1065075
0 Comments