Mumbai High Court : महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून याचिका दाखल केली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची परीक्षेच्या पद्धतीत एकसमानतेसाठी न्यायालयात काही विद्यार्थ्यांनी मिळून याचिका दाखल केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची उच्च न्यायालयात धाव

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची परीक्षेच्या पद्धतीत एकसमानतेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे समजते. राज्यातील विद्यापीठांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या आहेत तर काही विद्यापीठांच्या परीक्षा नियोजित आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या जात असल्याने परीक्षा घेताना एक समानता राहिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना एकसमान न्याय मिळालेला नाही. याविरोधात ही याचिका राज्यातील विविध विद्यापीठातील 11 विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-mumbai-marathi-news-students-from-various-universities-in-maharashtra-petition-in-high-court-1063448
0 Comments