Raj Thackeray भात्यातील बाण कुणावर सोडणार? मुख्यमंत्री ठाकरे, खा. बृजभूषण सिंहांच्या टीकेवर पलटवार?

<a href="https://ift.tt/qNULC3G Thackeray Pune Rally News Updates : मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. गेले काही दिवसांपासून राज्य सरकार राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंवर निशाणाही साधला होता. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं राज्य सरकार, भाजप सरकार बृजभूषण सिंह असण्याची शक्यता आहे. सोबतच आगामी निवडणुकांच्या संदर्भात देखील राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-raj-thackeray-sabha-in-pune-whom-will-he-target-in-speech-1061912

Post a Comment

0 Comments