Sambhajiraje Chhatrapati : खासदारकीसाठी शिवबंधन बांधणार का? संभाजीराजे आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करू असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. संभाजीराजे छत्रपती आज दुपारी 12 वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे. सध्यातरी राजेंचा शिवसेना प्रवेशास नकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजे सर्व मराठा समन्वयकांशी चर्चा करून पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.

संभाजीराजे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, खासदारकीसाठी शिवबंधन बांधणार का?

संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज दुपारी 12 वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावं, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप मुख्यमंत्र्यांच्या वतीनं संभाजीराजेंना देण्यात आला होता. यावर शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली होती. आता शिवसेनेची ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारल्याची माहिती आहे.

मराठा मोर्चा समन्वयकांशी चर्चा करुन निर्णय घेणार
शिवसेनेची ही ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मराठा मोर्चा समन्वयकांनी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशीही मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या:

महाविकास आघाडीच्या नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा; संभाजीराजेंच्या पाठिंब्यावरून शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

<a href="https://ift.tt/ctj8TO2 Pawar : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आमचा पाठिंबा शिवसेनेला, मग उमेदवार संभाजीराजे असो वा अन्य कुणीही: शरद पवार

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-political-news-shivbandhan-will-be-built-by-sambhaji-raje-chhatrapati-will-meet-the-chief-minister-today-1062153

Post a Comment

0 Comments