Maharashtra Monsoon Updates : गेल्या काही दिवसांपासून अडकलेली मान्सूनची (Monsoon) गाडी रूळावर आली असून मान्सूननं हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. काही तासांतच मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यासोबतच राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. काल (गुरुवारी) राज्यातील अनेक भागांत पावसानं (Rain Updates) दमदार हजेरी लावली. मुंबईसह (Mumbai) उपनगरांत पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या. तसेच, राज्यातील काही जिल्ह्यातही पावसाची हजेरी दिसून आली.

मुंबईत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर ठाणे, गोरेगाव, कल्याणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व सरींमुळं काहीसा दिलासा मिळाला आहे.

भिवंडी शहरासह ग्रामीण भागामध्ये काल अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्याने परिसरात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली आहे.

अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील काही भागात रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यात महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात धुक्याची चादर पसरलेली पसरली असून अनेक ठिकाणी घाटरस्ते या धुक्यात हरवले होते. या धुक्यातून वाट काढत पर्यटक मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत.

कोकणात मान्सूपूर्व पावसाची हजेरी

कोकणातही पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळाल्या. उत्तर रत्नागिरीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळल्याचं पाहायला मिळालं. काल (गुरुवारी) संध्याकाळी चिपळूण, खेड, दापोलीतही पावसानं दमदार हजेरी लावली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली भागात मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावली.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. गारपीट झाल्यानं शेतातील उभ्या पिकांना फटका बसणार आहे.

औरंगाबादला वादळी पावसानं झोडपलं

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागाला वादळी पावसानं झोडपून काढलं. औरंगाबाद शहराजवळ चित्तेपिंपळगाव येथे वादळी वाऱ्यामुळं हॉटेलमधील खुर्च्या आणि टेबल अक्षरश: उडाले. वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

येत्या 24 तासांत मान्सून कोकणात, हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढच्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. दरम्यान, यंदा मान्सून लवकर येणाचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र, मान्सूनच्या आगमनासाठी थोडा उशीर झाल्याचं दिसत आहे.

राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहेत. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुढच्या 4 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या 48 तासात मान्सून दाखल होणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याची स्थिती देखील आहे. पुढील चार दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-monsoon-update-will-arrive-konkan-in-24-hours-presence-of-pre-monsoon-rains-across-maharashtra-marathi-news-1068097
0 Comments