Mumbai Corona Update : देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं (Mumbai Corona Update) डोकं वर काढलं आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव (Mumbai Covid-19) दिवसागणिक वाढत चालला आहे. मुंबईमध्ये जूनच्या पहिल्या चार दिवसांमध्ये कोविड-19 रुग्णसंख्या झपाट्याने वाढणारा कोविड आलेख अधोरेखित करतो.

जूनची रुग्णसंख्या मार्चमधील रुग्णसंख्येच्या दुप्पट
मुंबई शहरासाठी आत्तापर्यंतची जूनची संख्या 3,095 आहे, जी मार्चमधील संपूर्ण रुग्णसंख्येच्या (1,519) च्या दुप्पट आहे, एप्रिलमधील जवळजवळ 60% रुग्णसंख्या (1,795) आणि मे महिन्यातील 50% पेक्षा (5,838) जास्त आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 60% पेक्षा जास्त रुग्णसंख्या मुंबईत आहेत, ज्यात जूनमध्ये 4,618 रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. राज्याच्या संपूर्ण मे महिन्यातील 9,185 प्रकरणांपैकी 50% पेक्षा जास्त रुग्णसंख्या अधिक दर्शवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क (BMC) झाली असून उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अशातच मुंबईत चौथी लाट येणार तर नाही ना? अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

तीन महिन्यांतील उच्चांक

शनिवारी, राज्यात मुंबईतील रुग्णसंख्येचा तीन महिन्यांतील उच्चांक नोंदवला गेला. मुंबईत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याने जूनमध्ये आत्तापर्यंतची मृत्यू संख्या दोन झाली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की “सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे आणि आपल्याला सावध राहण्याची गरज आहे, परंतु ही चौथी लहर नाही,” ते म्हणाले की, दिल्लीतही एप्रिलमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती, परंतु दैनंदिन रुग्णसंख्या पाहता पुढील चार ते पाच आठवडे रूग्णसंख्या वाढू शकते, परंतु नंतर स्थिर होईल आणि पुन्हा घसरण सुरू होईल,”

पुन्हा एवढी मोठी वाढ होण्याची शक्यता नाही

बीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, डॉक्टरांना सध्या चौथ्या लहरीबद्दल काळजी वाटत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे कोविडचा प्रकार ओमिक्रॉन. “देशभरात जीनोमिक सिक्वेन्सिंगने ओमिक्रॉन दर्शविले आहे. बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले की, मुंबईत 7 जानेवारी रोजी एकाच दिवसात 20,000 हून अधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहेत. “त्याच प्रकारामुळे पुन्हा एवढी मोठी वाढ होण्याची शक्यता नाही,”

कोरोनाव्हायरस लाइव्ह अपडेट्स
गेल्या आठवड्यात पुण्यात ओमिक्रॉन-कोविड, BA.4 आणि BA.5 चे नवीन सब व्हेरिएंट आढळले होते, यानंतर आता मुंबईतील 550 नमुन्यांच्या जीनोमिक सिक्वेन्सिंगची प्रतीक्षा आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी जिल्हा आणि नागरी प्रशासनांना शुक्रवारी पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, फ्लू सारख्या आणि श्वसन आजाराच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले तसेच व्हायरलचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका 'अॅक्शन मोड'मध्ये

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने इतर आजारांची शक्यता पाहता, आरोग्य यंत्रणेसह सर्वच खात्यांनी सुसज्ज राहावं, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि बाधितांचा शोध घेता यावा यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी दिल्या आहेत.

मुंबईत सध्या दररोज आठ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. ही संख्या आता 30 ते 40 हजारापर्यंत वाढविणं आवश्यक आहे. कारण सध्या बाधित रुग्णांचं प्रमाण आठ टक्क्यांपर्यंत पोहोचलं असून हा दर सावधानतेचा इशारा देणारा आहे. चाचण्यांची संख्या वाढली तर त्यामुळे जास्तीत-जास्त बाधितांचा शोध घेणे सोपे होईल आणि कोरोना संसर्गाला रोखता येईल. याबरोबरच सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी जिथे जिथे कोविड बाधित आढळतील, तिथे चाचण्यांची संख्या तातडीने वाढवावी. संबंधित बाधित रुग्णांचा संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/F7ledWq Update : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, बाधितांच्या शोधासाठी चाचण्या वाढविण्याच्या BMC आयुक्तांच्या सूचना

कोरोना लसीकरण जलद करण्यासाठी BMC ची 'हर घर दस्तक' मोहीम; 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना प्राधान्य

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-mumbai-corona-update-in-4-days-of-june-mumbai-covid-cases-double-the-march-tally-marathi-news-1066327
0 Comments