Gold Man : गोल्ड मॅन होण्याची हौस जीवावर बेतली, सोने लुटून विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार

<p><strong>Gold Man &nbsp;:</strong>&nbsp; गोल्ड मॅन होण्याची हौस वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतली. महिंद्र शिंगणे असं या कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्या अंगावरील सोनसाखळ्या, अंगठ्या आणि सोन्याची अन्य आभूषणं बळजबरीनं काढून घेऊन आरोपींनी त्याला त्याच्याच मोपेड वाहनाला बांधून विहिरीत फेकलं. २५ मे पासून महिंद्र शिंगणे बेपत्ता होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि संशयितांना ताब्यात घेतलं. संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका विहिरीची बारकाईनं पाहणी केली आणि मध्यरात्री महिंद्रचा मृतदेह विहिरीत सापडला. महिंद्र शिंगणे हा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कामाला होता. त्याचा अवैध सावकारीचा छुपा व्यवसायही होता. काही महिन्यातच तो निवृत्त होणार होता.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-gold-man-death-in-bhandara-1066042

Post a Comment

0 Comments