Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यद्वाराला रात्रीच्या वेळेस कुलुप बंद असल्यामुळे उपचाराच्या अभावी एका दीड महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी तसेच गावकऱ्यांनी केली आहे.

प्राथमिक केंद्राच्या मुख्य दाराला कुलूप, बालकाचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद असून या ठिकाणी रात्री 12 वाजेच्या सुमारास कायरव विकास नांदणे दीड महिन्याच्या मुलाची प्रकृती बरी नसल्याने कुटूंबियांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते, मात्र प्राथमिक केंद्राच्या मुख्य दाराला कुलूप लावले असल्याने गेट वरून कर्मचाऱ्यांना अर्धा तास पर्यंत आवाज दिले. मात्र कुणीही आले नाही. त्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या घरी जाऊन त्याला बोलाविण्यात आले व संबंधित डॉक्टरलाही बोलाविण्यात आले होते,

...तो पर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता
डॉक्टर आल्यावर बाळाला बघितले असता तो पर्यंत बाळाचा मृत्यू झालेला होता. डॉक्टर यांच्या हलगर्जीपणा मुळे एका दीड महिन्यांच्या मुलाचे मृत्यु झाल्याने संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतक मुलाच्या कुटूंबियांनी तसेच गावकऱ्यांनी केली आहे. तर या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असून चौकशी अंती जे निकाल येईल त्या दोषी अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करू असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे

दोषींवर कारवाई होणार का?
तर याच प्राथमिक आरोग्य केंद्रात घटनेच्या दिवशी एका महिलेची प्रसूती झाली असून या ठिकाणी परिचारिका हजर होत्या कि नव्हत्या आणि जर होत्या तर त्यांना आवाज का गेला नाही किंवा ड्युटीवर असताना मुख्य प्रवेश दाराला कुलूप लावून बाहेर का गेल्या? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे, त्यामुळे दोषी व्यक्तीवर काय कारवाई होते हे महत्वाचे असेल.

Mumbai Crime : कुत्र्यासोबत खेळण्यावरून वाद; आईसह मुलाला मारहाण, मुलाचा मृत्यू तर आई गंभीर

Crime News : मुलींसोबत मैत्री करण्यासाठी करायचा बाईक चोरी; हार विक्रेत्याला पोलिसांच्या बेड्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-gondia-primary-health-center-locked-at-night-death-of-child-due-to-lack-of-treatment-serious-allegations-of-parents-1065391
0 Comments