Turmeric exempted from GST : सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येणाऱ्या हळदीस जीएसटी (GST) करातून अखेर मुक्तता मिळालीय. महाराष्ट्र निर्णय प्राधिकरण मुंबई यांनी जीएसटी हा हळद या शेतीमालावर लागणार नाही, असा निर्णय दिलाय. यामागे सांगली बाजार आवारामध्ये शेतकरी हा स्वतः हळद विक्रीसाठी घेऊन येत असतो असे कारण देण्यात आले आहे. तसेच येथून पुढे हळद हा शेतीमाल म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे सांगली बाजार पेठेत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे.

पाच टक्के कर मागे घेतला

2017 पासून हळदीच्या खरेदीवर पाच टक्के जीएसटी कर लागू करण्यात आला होता.अखंड स्वरूपात असलेली हळद हा शेतीमाल असल्याचे लवादाने मान्य करुन हळदीवर लावण्यात आलेला पाच टक्के कर मागे घेतला. मात्र, हळदीवर पुढील प्रक्रिया म्हणजे पूड असेल तर मात्र कर लागू राहणार आहे. सांगली बाजारपेठ हळदीची देशातील मुख्य बाजारपेठ असून वार्षिक हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र हळदीच्या खरेदीवर पाच टक्के जीएसटी कर 2017 पासून लागू करण्यात आला होता. हळद हा शेतीमाल प्रक्रिया विरहीत असल्याने कर लागू होत नसल्याचे अडत व्यापाऱ्यांचे म्हणणे होते.

खरेदीदारांना मोठा दिलासा

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांनी जीएसटी का रद्द करावी? याबाबतची आपली भूमिका मांडली होती. मात्र हळद हा शेतीमाल असल्याचे आता लवादाने मान्य केले आहे. या निर्णयामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळालाय. या प्रकरणी हळदीचे अडत व्यापारी मेसर्स एन. बी पाटील पेढीने लवादाकडे अपील केले होते. यामुळे आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्ये हळदीचा व्यवहार करणाऱ्या कमिशन एजंटवर आता जीएसटी लागणार नाही.

हजार कोटीहून अधिक उलाढाल

सांगलीची हळद बाजारपेठ महत्त्वाची असून वार्षिक हजार कोटीहून अधिक उलाढाल होते. बाजारातील हळद सौदे करमुक्त करण्याच्या लवादाच्या निर्णयामुळे सांगली बाजारला आणखी उभारी मिळेल अशी आशा आहे. केंद्रीय करनिर्धारक सदस्य अशोककुमार मेहता आणि राज्य करनिर्धारक सदस्य राजीव कुमार मित्तल यांच्या समोर जीएसटी कर आकारणी बाबत सुनावणी झाली.

संबंधित बातम्या

Sangli Crime : सांगली जिल्ह्यात हत्यांची मालिका; एका आठवड्यात 5 हत्यांच्या घटनांनी खळबळ

Sangli Crime News : इस्लामपुरात सोयाबीनचं बोगस बियाणं विकणाऱ्या गोदामावर छापा; 23 लाख 50 हजाराचं बियाणं जप्त

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-turmeric-finally-exempted-from-gst-in-sangli-agricultural-produce-market-committee-1065709
0 Comments