Maharashtra Breaking News 30 June 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात, यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त
आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष रद्द झाल्यानंतर यंदाच्या वर्षी होत असलेल्या बाबा बर्फानी (Baba Barfani) यांच्या यात्रेला यात्रेकरूंचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पहलगाम बेस कँमवर सुमारे 10 हजार यात्रेकरु पोहोचले आहेत. यंदाची अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार आहे. आजपासून सुरु झालेल्या यात्रेची सांगता 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडे तणावाचं वातावरण आहे, यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासन तसेच पोलीस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहे. पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय परिसरात अतिरिक्त जवानही तैनात करण्यात आले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील अमरनाथ यात्रेच्या मार्गाच्या अगदी जवळ ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांना हे यश मिळाले. चकमकीत ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख लष्कर-ए-तैयबाचे (LET) दहशतवादी अशी झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मारलेल्या दहशतवाद्यांची लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी म्हणून ओळख पटली आहे.

आसाममध्ये पुरामुळं शेतीचं मोठं नुकसान

संततधार मुसळधार पावसामुळं आसाममध्ये पूर आला आहे. पुरामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील 40 लाखाहून अधिक लोक या पुरामुळं बाधित झाले आहेत. तर पूर आणि भूस्खलनामुळं आत्तापर्यंत 134 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. कालदिया नदीला आलेल्या पुरामुळे सध्याची परिस्थिती आणि नुकसानीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बजली जिल्ह्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी भबानीपूर, बजली येथील चारलपारा नयापारा येथील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. आसाममधील 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. भाजपच्या गोटात जल्लोष सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पेढे भरवून भाजपनं जल्लोष केला. बहुमत चाचणीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं मविआला धक्का दिला आणि बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. विरोधात निकाल गेल्यानं उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं जनतेला सांगितलं.

आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. आज या सत्तासंघर्षाचा दहावा दिवस. विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींनं सांगण्यात आलं. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

from maharashtra https://ift.tt/blVOCSW
via IFTTT

Post a Comment

0 Comments