Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 10 जून 2022 : शुक्रवार : एबीपी माझा

1. राज्यसभेसाठी बिनविरोध निवडणुकीची परंपरा चोवीस वर्षांनंतर खंडीत, मतदानाला सुरुवात

2. सहाव्या जागेवर विजयी होणारच, भाजपच्या धनंजय महाडिकांना विश्वास, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

3. एमआयएमची दोन मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात, थेट मविआला पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढींसाठी मतदान करणार

4. मतदानाचा हक्क मिळावा म्हणून अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची उच्च न्यायालयात धाव, निर्णयाकडे महाविकास आघाडीचं लक्ष

5. 48 तासात मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्याचा हवामान खात्याचा अंदाज, काल राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Maharashtra Monsoon Updates : गेल्या काही दिवसांपासून अडकलेली मान्सूनची (Monsoon) गाडी रूळावर आली असून मान्सूननं हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. काही तासांतच मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यासोबतच राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. काल (गुरुवारी) राज्यातील अनेक भागांत पावसानं (Rain Updates) दमदार हजेरी लावली. मुंबईसह (Mumbai) उपनगरांत पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या. तसेच, राज्यातील काही जिल्ह्यातही पावसाची हजेरी दिसून आली. मुंबईत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर ठाणे, गोरेगाव, कल्याणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व सरींमुळं काहीसा दिलासा मिळाला आहे.

6. पुणे मंडळाची म्हाडाची लॉटरी; पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5 हजार घरं

7. राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार, शिक्षण आयुक्तांचे निर्देश, विदर्भातील शाळा मात्र 27 जूनपासून सुरू होणार

8. मित्राच्या लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी गेलेल्या तरुणांचा अपघात; नवरदेवासह दोन मित्रांचा मृत्यू

9. श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन, खासदार उदयनराजेंचा संजय राऊतांना इशारा

10. मिलर-डुसेनची वादळी अर्धशतकं, दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात गड्यांनी विजय, ईशान किशनचं अर्धशतक व्यर्थ

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/top-10-maharashtra-marathi-news-maharashtra-news-smart-bulletin-10-june-2022-1068120

Post a Comment

0 Comments