Maharashtra Assembly session : शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा, दोन दिवसांचं अधिवेशन आजपासून, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी
<a href="https://ift.tt/2WwIjDE> Maharashtra Politics LIVE Updates : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनात आज (3 जुलै) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी असणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटात व्हिपवरुन जुंपण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून शिंदेंसह सर्व आमदारांना व्हिप बजावण्यात आला आहे. तर शिवसेनेचा व्हीप लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी काल दिली आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार काल गोव्याहून मुंबईत दाखल झाले.  हॉटेल ताज प्रेसिडेन्सीत शिंदे गटातील आमदार आणि भाजपच्या आमदारांची एकत्रित बैठक झाली. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबत त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं.
अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे.  विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
कोकणातील शिवसेनेचं निष्ठावान नेतृत्व राजन साळवी (Know About Rajan Salvi)
राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत. 
 साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.
2009 पासून सलग तीन वेळा राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
कोण आहेत राहुल नार्वेकर (Know About Rahul Narvekar) 
शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात 
तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार  
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई  
बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची 
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. शेवटी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करुन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब केला. नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या अधिवेशनात होणार आहे. त्याआधी उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. शिंदे गट आणि भाजपच्या बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे. 
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/ZklCL6U Narvekar : विधिमंडळात सासरे-जावई यांची जोडी, विधान परिषदेत सासरे तर विधानसभेत जावई
<a href="https://ift.tt/5t3QU7P Narvekar : भाजपकडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार
source https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-assembly-session-live-maharashtra-politics-legislature-2-days-session-on-july-3-and-4-cm-eknath-shinde-govt-floor-test-shiv-sena-mlas-speaker-polls-rahul-narvekar-vs-rajan-salvi-devendra-fadnavis-bjp-uddhav-thackeray-mva-latest-news-1075591
Post a Comment
0 Comments