Eknath Shinde Government : आज 29 जुलै 2022... बरोबर एक महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra Government) नवं सरकार येणार हे स्पष्ट झालं होतं. कारण, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री <a title="उद्धव ठाकरे" href="https://ift.tt/8pyg14Y" target="">उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात नवं सरकार आलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आज या सरकारला एक महिना होत आलाय. अद्याप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीय. पण, हा महिना त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. काय काय झालं, या महिन्याभरात? एकनाथ शिंदेंना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीनं हा एक महिना कसा होता... पाहुयात.. मागील महिनाभरात काय झालं, याचा लेखाजोखा घेऊयात.

सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी -
विधानपरिषदेच्या आमदारकीच्या निकालानंतर अचानक एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त येऊन धडकलं. एतनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेत सूरत गाठलं होतं. त्यानंतर एकामोगोमाग एक असे अपक्षासह तब्बल 49 आमदार सूरत मार्गे गुवाहाटीला पोहचले होते. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचं स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे यांच्या अभुतपूर्व बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सर्व बंडखोर आमदार गोव्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बहुमताच्या चाचणीला सर्व आमदारांनी उपस्थिती दर्शवली.

भाजपचे धक्कातंत्र -
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजप-शिंदे गटाचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, अशी सगळीकडेच चर्चा होती. पण राजभवानात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत वेगळेच समोर आलं. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं स्पष्ट केले. या सरकारमध्ये मी नसणार, बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं. भाजपचा हा निर्णय सर्वांसाठीच अनेपेक्षीत होतं. याची वाऱ्यासारखी चर्चा सुरु झाली. पण त्यानंतर काही क्षणांत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील असं सांगितलं. भाजपने दिलेला हा धक्का सर्वांसाठीच अनपेक्षीत होता.

शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी लढत -
बंडखोरी करणारा प्रत्येक आमदार आम्ही शिवसैनिक असल्याचं पहिल्यापासूनच सांगत राहिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासाठी आम्ही भाजपसोबत गेलो असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं. त्याचवेळी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी शिवसेनेवरच दावा केला. आमचीच शिवसेना खरी असल्याचं वारंवार सांगण्यात आलं. हा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर आहे.

महत्वाचे निर्णय बदलले -
शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर निर्णायांचा धडाका सुरु झाला. आधीच्या सरकारचे अनेक निर्णय बदलण्यात आले. तसेच अनेक नवीन निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रमुख्याने आरे कारशेडचा निर्णय होता. त्यानंतर औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतर हे निर्णय होते. यावरुन राज्यात वादंग झाला. आरे बाबात अद्यापही आंदोलन सुरु आहे. हे प्रकरणही कोर्टात गेलेय.

शिंदे सरकारचे महत्वाचे निर्णय

मुंबई मेट्रो-3च्या कारशेडचा निर्णय

मेट्रोच्या इतर कामांनाही परवानगी

बुलेट ट्रेनच्या कामाला हिरवा कंदील

एमएमआरडीएच्या योजनांना 12 हजार कोटीचं कर्ज

ओबीसी आरक्षणाचा निकाल

औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर

पेट्रोल-डिझेलमध्ये दरकपात

फोन टॅपिंग केस सीबीआयकडे सोपवली

सगळे सणवार निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय

गणेशमूर्तींच्या उंचीवरचे निर्बंध हटवले

गतिशक्ती, हर घर जल सारख्या योजना

जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीजदरात सवलत

लोणार सरोवर विकास आराखड्यास मान्यता

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान

जळगाव, ठाण्यातील जलसंपदा प्रकल्पाला मान्यता

मविआ सरकारचे कोणते निर्णय थांबवले?
शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णायांना स्थगिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवेसेनेच्या नेत्यांना धक्का बसला. यात बारामतीसह अनेक ठिकाणाच्या कामांचा निधी रोखला. त्यामुळंच विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली..

एकनाथ शिंदेंच्या फोन कॉलचे व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्री म्हणून काम सुरु केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे अनेक व्हिडीओ समोर आले. यामध्ये कधी त्यांनी आधिकाऱ्यांना झापलेले दिसले तर कधी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. कधी रुग्णांशी व्हीडिओ कॉल झाला... तर कधी अधिकाऱ्यांशी संवाद...कधी फोनवरुन चर्चा..तर कधी थेट पोलीस वसाहतीत भेट या ना त्या कारणानं एकनाथ शिंदे सतत चर्चेत राहिले...

मुख्यमंत्री झाल्यानंतर पाच वेळा शिंदे यांची दिल्लीवारी
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत पाच दिल्ली दौरे झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते 9 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपती, जे पी नड्डा, राजनाथ सिंग आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दुसऱ्यांदा 8 जुलै रोजी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अभित शाह यांची भेट घेतली. तिसऱ्यांदा ते 18 जुलै रात्री दिल्लीला रवाना झाले आणि 19 जुलै रोजी दिल्लीत शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर 22 जुलै रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंड यांच्या निरोप समारंभाला हजर राहण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. यानंतर 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते दिल्लीला गेले होते.

विरोधकांचं टीकास्त्र
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीकास्तर सोडलं. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन टोमणा लगावला. तर मुख्यमंत्र्यांना दिल्लीवारीवरुन लक्ष केले. दिल्लीवारीपेक्षा राज्यातील महापुराच्या संकटाकडे त्यांनी लक्ष द्यावं अशी मागणीही केली..आणि सर्वात महत्वाचं म्हणजे..मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार.. त्याचबरोबर एकनाथ शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम आहेत..असा आरोप होऊ लागला.

शिंदे-फडणवीस पत्रकार परिषदेची चर्चा
कारण 14 जुलैला झालेल्या एक पत्रकार परिषदेत. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना चिठ्ठी दिली. त्यानंतर शिंदे बोलता बोलता थांबले..हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्रोलही झाले. हा व्हिडीओ सोशल मिडीयातून जायच्या आधीच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. तो म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला त्यादिवशीचा... देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या हाताला धरुन त्यांना अगत्यानं मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवलं. त्याशिवाय माईक खेचल्याचाही व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

एकनाथ शिंदे यांच्यापुढे काय प्रश्न?

बंडखोरांना सांभाळण्याची कसरत

मंत्रिमंडळ विस्ताराचं आव्हान

पावसामुळं झालेलं शेतीचं नुकसान

शेतकऱ्यांना तातडीनं मदतीचं आव्हान

भाजपच्या नेत्यांशी समन्वय

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-political-news-one-month-for-the-shinde-government-know-review-of-the-month-events-1084657
0 Comments