Maharashtra Rains : जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जोर जुलैमध्ये वाढला आहे. कालपासून राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच कोकणात देखील चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पालघरमध्ये जोरदार पावसाची हजेरी

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील सरतोडी भागांमध्ये शुक्रवारी रोजी झालेल्या पहिल्याच पावसात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गावकरी तसेच शाळेतील मुलांना दोरीचा आधार घेत मानवी साखळी करुन पुरातील पाण्यातून रस्ता काढत जावे लागले.धुळे शहरात काल सायंकाळी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसून दिवसभर ढगाळ वातावरण कायम असत. जिल्ह्यात 100 मिमी पेक्षा कमी पाऊस झाला असून पेरण्या पूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर भायखळा आणि कुलाब्यात 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. 204 मिमीहून अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी म्हटले जाते. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. काल दिवसभर झालेल्या पावसामुळं मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीसह पुणे, पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-rains-in-different-parts-of-the-state-1075314
0 Comments