<p>राज्यात राजकीय भूकंप झाला आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं त्याला महिना पूर्ण झालाय. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर सत्तांतर झालं. पण महिना पूर्ण झाला तरी अजूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं दोनच जणांचं मंत्रिमंडळ कार्यरत आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे आणि दुसरीकडे न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवारही सरकारवर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारनं आधीच्या ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती देऊन दणका दिला. तर झपाट्यानं काही निर्णय घेऊन आपल्या सरकारची छाप पाडण्याचा प्रयत्नही केला. पण महिना पूर्ण झाल्यानंतर सरकारच्या कामगिरीपेक्षा राजकीय कुरघोडी आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार याचीच चर्चा अधिक आहे.......</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-shinde-fadnavis-govt-one-month-completed-1084688
0 Comments