Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या PA च्या नावाने आपल्याला धमकीचा फोन आल्याचा आरोप शिवसेनेचे सह संपर्क प्रमुखांनी केला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पी ए चे नावाने धमकीचा फोन?

बंडखोर एकनाथ शिंदे च्या स्वीय सहाय्यकाची जळगावच्या सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप गुलाबराव वाघ यांनी केला आहे, मात्र अशा धमक्यांना आपण भिक घालणार नाही अस गुलाबराव वाघ यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहायकाने जळगावचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत स्वतःसह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आरोप केला आहे

आमदारांचा विरोध करायचा नाही, नाहीतर....
जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात जळगावात काल शिवसेनेच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आक्रोश मोर्चा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चात सहभागी होत असताना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना मोबाईलवर फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मी एकनाथ शिंदेंचा पीए बोलत असून तुम्ही आमदारांचा विरोध का करत आहात? विरोध करायचा नाही नाहीतर तुम्हाला जीवे ठार मारू, अशी धमकी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने गुलाबराव वाघ यांना दिली.

धमकीचा फोन आल्याचे जाहीर भाषणात सांगितले

त्याला गुलाबराव वाघ यांनी प्रत्युत्तर दिले, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला जे करायचे असेल ते करा. बंडखोरांचा यापुढे विरोध करूच. असे प्रत्युत्तर गुलाबराव वाघ यांनी दिले. मोर्चाच्या समारोप झाल्यानंतर गुलाबराव वाघ यांनी भाषण करताना एकनाथ शिंदे यांच्या पीएचां धमकीचा फोन आल्याचे जाहीर भाषणात सांगितले.

*पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार..*

दरम्यान धमकीनच्या फोन बाबत गुलाबराव वाघ यांनी बोलताना माहिती दिली. तसेच ज्या क्रमांकावरून धमकीचा फोन आला होता, तो मोबाईल क्रमांकही त्यांनी दाखविला.अशा धमक्यांना मी घाबरणार नाही बंडखोराच्या विरोधात शिवसैनिक एकवटला आहे व त्याची एकजूट यापुढेही अशीच कायम राहील असे त्यांनी सांगितले. तसेच धमकीच्या फोन बाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातले ही आमदारांचा सहभाग आहे. या आमदारांविरुद्ध जळगाव जिल्ह्यात विविध मेळाव्यांच्या माध्यमातून शिवसैनिक तसेच शिवसेना पदाधिकारी रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

सेनेचा इशारा

या धमकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी म्हटल आहे की आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हात लावला तर आम्ही एकालाही सोडणार नाही असा इशारा सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी यावेळी दिला आहे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-political-marathi-news-chief-minister-eknath-shinde-pa-threatening-phone-call-allegation-of-shiv-sena-activists-1075585
0 Comments