Maharashtra Rain : महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस, नाशिकसह वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

Maharashtra Rain : महाराष्ट्रात आत्तापर्यंत चांगला पाऊस (Rain) झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावासानं हजेरी लावली आहे. 1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत राज्यात सरारीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं (Meteorological Department) दिली आहे. सांगली जिल्हा सोडता संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तिथे सरासरीच्या 53 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 957 मिमी पावसाची नोंद

महाराष्ट्रात आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 31 ऑगस्टपर्यंतची आकडेवारी हवामान विभागानं प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सरासरीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरवर्षी 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 814 मिमी पाऊस होत असतो, मात्र, प्रत्यक्षात यावर्षी 957 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

पूर्व विदर्भातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस, तर मुंबईत सरासरीच्या 15 टक्के कमी पाऊस

राज्यातील सांगली जिल्हा सोडता संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. सांगलीत सरासरीच्या 21 टक्के कमी पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला आहे. सरासरीच्या 53 टक्के अधिक पावसाची नोंद नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाली आहे.  त्यानंतर नांदेडमध्ये सरासरीच्या 50 टक्के अधिक पाऊस तर नागपुरात सरासरीच्या 47 टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.  दरम्यान, पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपुरात सरासरीच्या 30 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यातही समाधानकारक पावसाची नोंद ढाली आहे. मात्र, मुंबई शहरात सरासरीच्या 15 टक्के कमी पाऊस झाला आहे. तरीही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. पुणे आणि पालघरात सरासरीच्या 30 टक्के अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/cTouYNV Rain : नाशिकसह परिसरात मुसळधार पाऊस, गंगापूरसह दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

<a href="https://ift.tt/cHRMLXB Rain  : मुंबईसह पुणे रायगड आणि पालघरमध्ये पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात यलो अलर्ट

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/18-percent-more-than-average-rainfall-in-maharashtra-from-june-1-to-august-31-1095747

Post a Comment

0 Comments