Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह परिसरात पहाटेपासून पावसाची रिपरिप, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर..

<p><strong>Maharashtra Rain Live Updates :</strong> राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच मुंबई &nbsp;(Mumbai) आणि ठाणे (Thane) परिसरात पाऊस पडत आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, आज विदर्भात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज पावासाचा यलो अलर्ट असून मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. &nbsp;</p> <p>राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पहाटेपासूनच मुंबईत पावासाला सुरुवात झाली आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, 1 सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. &nbsp;पावसाचा जोर वाढणार असल्यानं शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-28-august-2022-rainfall-in-the-state-1094336

Post a Comment

0 Comments