Maharashtra Rain  : विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Rain : राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच मुंबई  (Mumbai) आणि ठाणे (Thane) परिसरात पाऊस पडत आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, आज विदर्भात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज पावासाचा यलो अलर्ट असून मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड तर पश्चिम महााष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पहाटेपासूनच मुंबईत पावासाला सुरुवात झाली आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, 1 सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  पावसाचा जोर वाढणार असल्यानं शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.

अतिवृष्टीचा राज्यातील शेती पिकांना मोठा फटका

अतिवृष्टीचा राज्यातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीनं राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर असून, बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर आहे. फळ पिकांमध्ये 36 हजार 294 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टी आणि पूर यामुळं आत्तापर्यंत सुमारे 138 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तातडीची मदत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/YIg4SBd Rain : मान्सून 15 दिवस आधीच निरोप घेणार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरु होणार परतीचा प्रवास

<a href="https://ift.tt/AnGihRM News : जुलै महिन्यात 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका, पहिल्या टप्प्यात 22 लाख 89 हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-rainfall-in-the-state-1094337

Post a Comment

0 Comments